शरद पवार – उदयनराजे यांच्यात बंद खोलीत चर्चा, बैठकीनंतर खास उदयनराजे स्टाईल प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ !

शरद पवार – उदयनराजे यांच्यात बंद खोलीत चर्चा, बैठकीनंतर खास उदयनराजे स्टाईल प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ !

सातारा – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज साता-यात आले होते. यावेळी जिह्यात विश्रामगृहात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले यांनीही यावेळी पवार यांची भेट घेतली. तसंच शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात बराच वेळ बंद खोलीत चर्चा झाली. उदयनराजे आणि पक्षाचे स्थानिक नेते यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.

पवारांच्या भेट घेऊन परतत असताना खासदार उदयनराजे यांना पत्रकारांनी गाठले आणि बैठकीबद्दल विचारणा केली. त्यावेळी शरद पवारांचे कौतुक करत पवारांनी मला कडकडीत मिठी मारली. पण मी त्यांना म्हणालो फसवा फसवी मात्र करु नका, नाहीतर बघू अशा प्रकाराच इशाराच त्यांनी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. सातारा लोकसभा निवडणुकीचे तिकीट उदयनराजे यांना दिलं जातं की नाही अशी चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर या वक्तव्याला महत्व आलं आहे.

विश्रामग्रहावर सिक्कीम चे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, अमदार दिपक चव्हाण हे उपस्थित होते.  विश्रामगृहातून बाहेर आलेले उदयनराजे चुकुन शरद पवार यांच्या टोयाटो लेक्सस गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. चुक लक्षात आल्यानंतर माझी आणि पवार साहेबांची एकच गाडी आहे असे आणि रंग देखील सारखाच असल्याचे सुचक वक्तव्य केले.

COMMENTS