मुंबर्ई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात 10 दिवसांपूर्वीच बैठक झाली असल्याची माहिती समोर आली. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. याला खुद्द शरद पवार यांनी दुजोरा दिला असल्याचे एका वृत्त वाहिनीने म्हटले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
तुम्ही तुमची भूमिका घ्या, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका ठरवेल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेना सरकारमध्ये राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने नवी चाल खेळल्याचे बोलले जात आहे.
COMMENTS