तुम्हाला किती मदत करायची हे आता बेस्ट ठरवेल, शशांक राव यांचा उद्धव ठाकरेंना इशारा !

तुम्हाला किती मदत करायची हे आता बेस्ट ठरवेल, शशांक राव यांचा उद्धव ठाकरेंना इशारा !

मुंबई – बेस्ट कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्थाची नेमणूक केली असून त्यानंतर बेस्ट कामगारांचे नेते शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तसेच प्रशासनाने मागण्या मान्य केल्या असून कामगारांच्या पगारात किमान 7 हजार रुपयांची वाढ होईल, असेही राव यांनी यावेळी सांगितले. “2007 असो किंवा 2011 कोणत्याही साली लागलेल्या कर्मचाऱ्याला किमान 7 हजार रुपये वेतन वाढणार आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारवाढ पुढच्याच महिन्याच्या पगारातून मिळेल. इतकंच नाही तर 2016 पासूनची सर्व थकबाकीही नव्या करारानुसार मिळणाक असल्याचं राव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले पैसे नाहीत, कुठून आणू, बेस्टला किती मदत करायची? पण आता तुम्हाला किती मदत करायची हे आता बेस्ट ठरवेल असंगी शशांक राव यांनी ठणकावून सांगितलं आहे. शिवसेनेकडे बेस्ट समिती आहे. परंतु त्यांनी ज्युनियर ग्रेडचा प्रश्न कधीच मिटवला नाही. हा प्रश्न मिटवणं त्यांना सहज शक्य होतं. पण त्यांनी तो प्रश्न कायमच धुमसत ठेवला असल्याचा आरोपही यावेळी  शंशाक राव यांनी केला.

तसेच संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्माच्या नोटीसा मिळाल्या आहेत. पण त्या घरात फोटोफ्रेम करुन ठेवा. कारण तुम्ही एका ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार आहात, असंही यावेळी शशांक राव यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS