दिल्ली – ज्येष्ठ भाजप नेते शुस्त्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी थेट पक्षाध्यक्ष अमित शहा त्यांचा मुलगा जय शहा आणि मोदींच्या जवळचे समजले जाणारे अदानी, अंबानी आणि बाबा रामदेव यांच्या संपत्तीवरून सरकारला टोमणे मारले आहेत. तसं ट्विट शत्रूघ्न सिन्हा यांनी केलं आहे. मोदी सरकारमध्ये गौतम अदानींचा विकासदर 66 टक्के, मुकेश अंबानींचा विकासदर 67 टक्के, बाबा रामदेव यांचा विकासदर 173 टक्के, अमित शहा यांचा विकासदर 300 टक्के तर जय शहा यांचा विकासदर 16000 टक्के वाढला आहे. त्यामुळे देश बदल रहा है असंही सिन्हा म्हणाले.
दिवसेंदिवस भाजमधील नाराजांची संख्या वाढत आहे. यशवंत सिन्हा आणि शत्रूघ्न सिन्हा गेली अनेक दिवस भाजपच्या आणि मोदी शहांच्या ध्येय धोरणांवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भंडार गोंदियांचे खासदार नाना पटोले यांनी थेट खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील उदीत राज हे खासदारही पक्षावर नाराज असून त्यांची पक्षाच्याच विरोधात मोहिम उघडली आहे. तर विदर्भातील आमदार आशिष देशमुख यांनीही त्यांच्याच राज्यसरारविरोधात विदर्भात यात्रा काढली आहे.
मोदी राज में विकास दर..
गौतम अडानी – 66%
मुकेश अम्बानी – 67%
बाबा रामदेव – 173%
अमित शाह – 300%
जय शाह – 16000%बधाई हो, देश बदल रहा है ????
— Shatrughan Sinha (@sirshatrughanji) January 14, 2018
COMMENTS