भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरात गोळीबार !

भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरात गोळीबार !

मुंबई – भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरात गोळीबार झाला असल्याची घटना घडली आहे. रविवारी ही घटना घडली असून या गोळीबारात कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाकडून चुकून गोळी झाडली गेली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. याबाबतची बातमी अमर उजाला या हिंदी वृत्तपत्राने दिली आहे.

दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील जुहू येथील घरात ही घटना घडली असून काल पोलीस ऑन ड्युटीवर असताना अचानक त्यांच्या बंदुकीतून गोळी सुटली. बंदूकीच्या गोळीचा आवाज आल्यामुळे काही काळ परिसरात शांतता पसरली होती. परंतु बंदूकीची साफसफाई करत असताना चुकून गोळी सुटली असल्याची माहिती मिळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

 

COMMENTS