सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर गोरे यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न, दरोडा यासारखे गुन्हे शेखर गोरे यांच्यावर लावण्यात आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शेखर गोरे यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा प्रककारचे गुन्हे आहेत. त्यामुळेच जिल्हा पोलीस अधिकक्षक रसंदीप पाटील यांच्या आदेशानंतर शेखर गोरे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात खंडणी, लूटालूट आणि प्राणघातक हल्ले यामुळे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. ती मोडून काढण्यासाठी आणि जिल्ह्यात गुन्हेगारांना योग्य तो संदेश देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं बोलंलं जातंय. 2014 मध्ये माण खटाव या मतदारसंघातून शेखर गोरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढवली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तसंच सातारा सांगली विधान परिषद निवडणुकही त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवली होती. मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला होता.
COMMENTS