मुंबई – होय मी चुकलो, शिवसैनिकांनो, मला माफ करा, बारा वर्षांपूर्वी शिवसेना सोडणं ही माझी चूक होती, असा खेद मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिशिर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.तसेच यापुढे शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये आयोजित केलेल्या 52 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात शिशिर शिंदे बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलत असताना शिशिर शिंदे यांनी आपल्या थोडक्या शब्दात भावना व्यक्त केल्या. “उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटलो. निघताना त्यांच्या हाताला स्पर्श केला, तेव्हा बाळासाहेबांची आठवण झाली असल्याचंही यावेळी शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिशीर शिंदेंच्या मनगटावर शिवबंधन बांधून, हातात भगवा झेंडा देऊन, त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यानंतर शिशिर शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व सर्व शिवसैनिकांचे आभार मानले.
COMMENTS