शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सगळी कागदपत्रं खिशात, अण्णा हजारेंचा निर्वाणीचा इशारा

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सगळी कागदपत्रं खिशात, अण्णा हजारेंचा निर्वाणीचा इशारा

अहमदनगर : भाजपच्या नेत्यांच्या मध्यस्थीनंतर जेष्ठ् समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित केले. यावर सामनाच्या आग्रलेखात अण्णा हजारेंच्या भूमिकावर शंका उपस्थित करण्यात आली होती. तसेच अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!,” असा सवाल करण्यात आला होता. यावर राळेगणसिद्धीत अण्णांनी आक्रमक भूमिका घेऊन शिवसेनाला इशारा दिला आहे.

अण्णा हजारे म्हणाले, “आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्या वेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेला दिला

“तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असं अण्णा म्हणाले. तसेच, भाजप सत्तेवर आल्यानंतर माझे एकूण 6 आंदोलनं झाली, हे आंदोलन आपण विसरलात का?,” असा प्रतिप्रश्नही त्यांनी शिवसेनेला केला.

COMMENTS