मुंबई – शिवस्मारक हे अरबी समुद्रात नको तर ते जमिनीवरच उभारा अशी मागणी मराठा सेवा संघाच्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी गेलेल्या बोटीला समुद्रात अपघात होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात शिवस्मारकाचा हट्टा सोडा अशी मागणी मराठा सेवा संघाच्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. हे स्मारक जमिनीवर उभारलं गेलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. हे स्मारक अरबी समुद्रात बांधल्यास असे प्रकार नेहमी होत राहतील. त्यामुळे ते जमिनीवर उभारलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवाजी महाराज शूर असले तरी ते जनतेचे होते, त्यामुळे स्मारक सिंहासनाधिष्ठित असावं असावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. शिवस्मारक समुद्रात उभारलं तर भरतीवेळी ते बंद राहण्याची शक्यता आहे. सोबतच तिथपर्यंत प्रवास करणं खर्चिक राहिल. तिथे असणाऱ्या खाण्याच्या गोष्टी वैगेरे, तसंच इतर जे काही असेल ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर असेल. जर जमिनीवर स्मारक बांधलं तर पैसे वाचतील त्यामुळे हे स्मारक जमिनीवरच बांधलं पाहिजे अशी मागणीही खेडेकर यांनी केली आहे.
COMMENTS