शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यावरुन महाराजांचे वंशज नाराज !

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यावरुन महाराजांचे वंशज नाराज !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यावरून शिवाजी महाराजांच्या वंशजांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली असून छत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यापेक्षा सरकारने जगातील सर्वात लहान पुतळा उभारावा अशी उपहासात्मक टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.

दरम्यान राज्य शासनाने पुन्हा छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी केली आहे. मूळ आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची १९२ मीटर प्रस्तावित केली होती. याबाबतची माहिती मिळताच विरोधकांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची १६० मीटर आणि चौथऱ्याची उंची ३२ मीटर अशी रचना करण्यात आली होती. या संरचनेनुसार राज्य शासनाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे २ फेब्रुवारी २०१५ रोजी पर्यावरणीय मंजुरीसाठी अर्ज केला आणि २३ फेब्रुवारी २०१५ रोजी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली.

परंतु  महाराजांच्या धातूच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची १६० मीटरवरून १२६ मीटर कमी केली तर त्याखाली असलेल्या काँक्रिटच्या चौथºयाची उंची ३२ मीटरवरून वाढवून ८४ मीटर करण्यात आली. एकूण स्मारकाची उंची पूर्वीच्या तुलनेत १८ मीटरने वाढवली असली तरीदेखील प्रत्यक्षात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची ३४ मीटरने (११२ फूट) कमी करण्यात आल्याची माहिती विरोधकांनी सभागृहात दिली आहे. यानंतर आता शिवेंद्रसिंह राजे यांनी देखील सरकारवर नाराजी व्यक्त केली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS