आता याला काय म्हणायचं ? मोदींचे मंत्री म्हणतायेत मोदींनी तरुणांना नोक-यांचं आश्वासन दिलच नव्हतं !

आता याला काय म्हणायचं ? मोदींचे मंत्री म्हणतायेत मोदींनी तरुणांना नोक-यांचं आश्वासन दिलच नव्हतं !

भाजपचे अनेक वाचाळवीर नेते आजपर्यंत पाहिले आहेत. त्यांच्या बोलण्यातून ते नेहमीच पक्षाला अडचणीत आणत असतात. आता तर थेट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांनी एक विधान केलं आणि त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटायला लागले आहेत. नरेंद्र मोदींनी किंवा भाजपनं 2014 च्या निवडणुकीमध्ये तरुणांना नोक-या देण्याचं आश्वासनच दिलं नव्हतं असं वक्तव्य भाजपचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केलं आहे.

शिवप्रताप शुक्ला यांनी नवभारत टाईम्स या हिंदी वृत्तपत्राला एक मुलाखत दिली आहे. त्यामुध्ये त्यांनी मोदींना 2014 मध्ये तरुणांना नोक-या देण्याचं आश्वासन दिलं नव्हतं. तर तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं होतं असं वक्तव्य शिवप्रताप शुक्ल यांनी केलं आहे. महागाई आणि विकास दर घसरल्यामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. त्यावरही त्यांनी या दोन्ही समस्या या जागतिक समस्या आहेत. या केवळ भारताच्या समस्या नाहीत असं सांगून टाकलं.

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात तरुणांना दरवर्षी तरुणांना 1 कोटी नोक-या देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते तेही निवडणुक जुमला होतं की काय असा प्रश्न आता पडू लागला आहे. मोदींनी आमचं सरकार सत्तेवर आलं तर अच्छे दिन येतील. परदेशातील काळा पैसा परत आणल्यावर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करु अशी आश्वासने दिली होती. तीही हवेतच विरली आहेत.

मोदी मंत्रिमंडळातील मंत्री नितीन गडकरी यांनी तर अच्छे दिन या संकल्पनेची काही दिवसांपूर्वी खिल्ली उडवली होती. अच्छे दिन असा काही प्रकार नसतो. अच्छे दिन हमारे गले की हड्डी बन गयी है असं सांगत तो एक चुनावी जुमला होता असं वक्तव्य खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलं होतं. आता मतदारांना भाजपच्या कोणत्या आश्वासनांवर आणि कोणत्या नेत्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा असा प्रश्न पडला तर नवलं वाटायला नको.

COMMENTS