शिवसेना नेत्याचा अपघाती मृत्यू, शिवसैनिकांकडून घातपाताचा संशय!

शिवसेना नेत्याचा अपघाती मृत्यू, शिवसैनिकांकडून घातपाताचा संशय!

रायगड – शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रात्री 2 च्या सुमारास त्यांच्या गाडीला अपाघात झाला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.महाडमध्ये ही घटना घडली आहे.कालगुडे यांचा मृत्यू घातपात की अपघात असा संशय शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान भरधाव वेगात येणारा ट्रेलर धडकल्याने हा अपघात झाला आहे. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय शिसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत असुन  कालगुडे यांचा मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानंतरच हा अपाघात आहे की घातपात हे समजणार आहे.

COMMENTS