पुणे – मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना संपवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देऊ नका अशी मागणी स्थानिक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शरद सोनवणे यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत उद्धव ठाकरे हे देखील सकारात्मक असल्याची माहिती आहे.
मनसे आमदार, शरद सोनवणे
दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जुन्नर विधानसभेसाठी गटनेत्या आशा बुचके यांना उमेदवारी जाहीर करण्यात यावी. पक्षप्रमुखांवर आम्हाला विश्वास असून त्यांनी मला विधानसभेची शेवटची संधी द्यावी अशी मागणीही आशा बुचके यांनी केली आहे. तसेच पक्षप्रमुखांनी सोनवणे यांना लादल्यास आम्ही पदाचे सामुदायिक राजीनामे देऊ, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे याबाबत उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS