बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात काही जिल्ह्यांतील प्रत्येक घडामोडीचा राज्याच्या राजकारणावर दिसून येत असतात. त्यामधील वरच्या क्रमांकावर असलेल्या बीड मुंडे कुंटुंबातील वादाला स्वल्प विराम मिळाला असताना आता क्षीरसागर दुरावा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या आमदार संदीप क्षीरसागर नगरसेवकांना शिवसेनेत आणले. त्याचा बदल घेण्यासाठी संदीप क्षीरसागर यांनी थेट भाजपचे आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राममधील नेत्यासह १५० कार्यकर्त्यांच्या हातावर घड्याळ बांधले.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यातही बीड मतदारसंघात शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आ. संदीप क्षीरसागर या काका पुतण्यात रस्सीखेच सुरू असते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत आ. संदीप क्षीरसागर यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातच काही दिवसात राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का दिला होता.
बीड नगरपालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोरच राष्ट्रवादीला धक्का बसल्याने संदीप क्षीरसागरांनी आता शिवसंग्रामच्या नेते- कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आ. विनायक मेटे यांना मोठा झटका दिला आहे. पेठ बीड परिसरात विनोद हातांगळे यांची मोठी पकड आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने हातांगळे यांच्यासह 150 कार्यकर्त्यांना जाहीर प्रवेश देऊन रिकामी झालेली पोकळी भरून काढली आहे.
गेल्या वर्षभरात शिवसंग्रामला मोठी गळती लागली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची कदर नसल्याची नाराजी पक्षात उघड झाली आहे. आ. विनायक मेटे आणि त्यांचे बंधू रामहरी मेटे यांच्याभोवतीच राजकारण फिरत असल्याने अनेक बढे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे कार्यकर्ते टिकवून ठेवणे हे मेटे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
COMMENTS