शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांना आज उद्धव ठाकरेंनी दिला एबी फॉर्म!

शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांना आज उद्धव ठाकरेंनी दिला एबी फॉर्म!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्मचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज काही नेत्यांना एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी घोषित केली आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाऊसाहेब कांबळेंना श्रीरामपुरातुन शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे.

तर सांगोल्यातून संभाजी बापू पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

त्याचबरोबर कल्याण ग्रामीणमधून शिवसेना आमदार सुभाष भोईर यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

परंडा मतदारसंघातून तानाजी सावंत यांना एबी फॉर्म दिला.

पाटण मतदारसंघातून सभराज देसाई यांना एबी फॉर्म दिला.

पांडूरंग बरोरा यांना शहापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान श्रीरामपुरातील काही शिवसैनिकांनी भाऊसाहेब कांबळेंना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. परंतु विरोध असतांनाही उद्धव ठाकरे यांनी कांबळेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे स्थानिक वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. कांबळे हे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक होते. परंतु त्यांनी थोरात यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता.

COMMENTS