नवी दिल्ली – सरकारमध्ये सामिल असलेली शिवसेना सातत्याने भाजप सरकावर टीका आणि हल्लाबोल करत असते. आजतर थेट राजधानी दिल्लीत शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. देशाच्या राजधानीत मोदी आणि भाजप सरकाविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे खासदार आणि हजारो शिवसैनिक सामिल झाले होते. नाशिक विमानतळ सुरू होत नसल्यामुळे शिवसेना खासदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल एविएशनच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान योजना सुरू करून विमानाने शहरांना जोडण्याचा संकल्प केला. परंतू या योजनेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. उडान योजनेत पहिल्यात टप्प्यात नाशिक-पुणे आणि नाशिक-मुंबई हवाई मार्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. तसेच, ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत विमानसेवा सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतू अद्यापही विमानसेवा सुरू झाली नाही. डीजीसीएची मान्यता तसेच टाईम स्लाॅट साठी धावपळ करूनही हाती निराशा आली. यापूर्वी गुजरातमधील सूरत, कांडला आणि पोरबंदर या ठिकाणी जीव्हीके ने टाइम स्लाॅट ला मान्यता दिली परंतू महाराष्ट्रात दिली नाही. हा महाराष्ट्रावरचा अन्याय असल्यामुळे शिवसेना आंदोलन करीत असल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे.
COMMENTS