मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती होणार असल्याचं बोललं जात आहे. दोन्ही पक्षात जागावाटपाची चर्चाही सुरु आहे. परंतु दुसय्रा बाजूला मात्र हे दोन्ही पक्ष स्वबळाची तयारीही करत असल्याचं दिसत आहे. कारण विधानसभेसाठी भाजपानं राज्यातील सर्व मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर आता शिवसेनाही स्वबळाची तयारी करत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान शिवसेना भवनावर आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाही राज्यातील सर्व जागांसाठी मुलाखती घेत आहे. सुरूवातीच़्या टप्यात पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत असुन आज पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडत आहेत.
२० सप्टेंबरपर्यंत या मुलाखती चालणार आहेत.
COMMENTS