पडद्यामागून शिवसेना-भाजपची युती, ‘या’ जागांवर लढवणार निवडणूक ?

पडद्यामागून शिवसेना-भाजपची युती, ‘या’ जागांवर लढवणार निवडणूक ?

मुंबई आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र समोर येत आहे. विधान परिषदेच्या ६ जागांसाठी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही युती झाली असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे पडद्यामागच्या या युतीबाबत शिवसेना – भाजपकडून कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

दरम्यान 3 जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर 3 जागांवर भाजपकडून उमेदवार देण्यात येणार आहे. नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच काहिशी अवस्था शिवसेना भाजपची झाली असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS