ब्रेकिंग न्यूज – शिवसेना-भाजपच्या महायुतीबाबत मोठी घोषणा !

ब्रेकिंग न्यूज – शिवसेना-भाजपच्या महायुतीबाबत मोठी घोषणा !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणार की नाही याबाबत तर्कवितर्क लावले होते. परंतु युतीचं चित्र आज अखेर स्पष्ट झालं असून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना, भाजपा , रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुती झाल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. परंतु भाजपा आणि शिवसेना राज्यातील किती जागांवर निवडणुका लढवणार याचा फॉर्म्युला पाटील यांनी अजून सांगितला नाही.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत युती होणार आहे. मात्र युतीनंतर बंडखोरीची शक्यता नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. भाजप-शिवसेनेचं संघटन संपर्क मोठा असल्याने नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना समजवण्याची काही व्यवस्था आहे. नेते नाराज होणार हे नैसर्गिक आहे, मात्र ते त्यामुळे बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात जातील याची शक्यता नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. जागावाटप पूर्ण झाला असून लवकरच एका पत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात येणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

COMMENTS