…तर आगामी निवडणुकीत आघाडीलाच फायदा होणार, भाजपचा सर्व्हे !

…तर आगामी निवडणुकीत आघाडीलाच फायदा होणार, भाजपचा सर्व्हे !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात आघाडीची पहिली सभा पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनही सर्व्हे केला असल्याची माहिती आहे. या निवडणुकीत शिवसेनेची युती झाली तरच दोन्ही पक्षांना फायदा होईल, अशी माहिती भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आली आहे. तसेच युती न झाल्यास त्याचा थेट फायदा आघाडीला होणार असल्याचंही या सर्व्हेतून समोर आलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजपनं एकत्र लढल्यास 30 ते 34 जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेत मांडण्यात आला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 18 ते 20 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच स्वबळावर लढल्यास भाजपला केवळ 15 ते 18 जागांवर तर शिवसेनेला 8 ते 10 जागांवर समाधान मानावं लागेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 22 ते 28 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार का ? याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS