लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र,   41 जागांबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात ?

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र, 41 जागांबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही पक्षांमधील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा पुढे सरकली असल्याची माहिती आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा स्वत:कडे कायम ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे 41 जागांबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असून उर्वरित 7 जागांचा निर्णय बाकी आहे. परंतु याबाबत  भाजप-सेनेने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 18 तर भाजपनं 23 जागांवर विजय मिळवला होता. आगामी निवडणुकीसाठी युतीमध्ये दोन्ही पक्ष आपण जिंकलेल्या जागा स्वत:कडे ठेवून घेणार आहेत.

तसेच उर्वरित 7 जागांवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. शिवसेनेसोबतचा तणाव कमी व्हावा यासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे युतीबाबत या दोन्ही पक्षांमधील अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS