रावसाहेब दानवे, एकनाथ खडसेंना भाजपचा धक्का, दोन्ही मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडणार ?

रावसाहेब दानवे, एकनाथ खडसेंना भाजपचा धक्का, दोन्ही मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडणार ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला खूष करण्यासाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजकीय बळी देण्याचा विचार पक्षात सुरू असल्याची माहिती आहे. कारण रावेर आणि जालना मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला जाणार असल्याची शक्यता आहे.

रावेर मतदारसंघात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे, तर जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे हे मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडले तर या दोन्ही नेत्यांचा बळी जाणार असल्याचं दिसत आहे.  याचबरोबर लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची असेल तर विधानसभेचाही फॉर्म्युला आताच ठरविण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. त्यावरही भाजपचा विचार सुरु असल्याची माहिती आहे.

COMMENTS