मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील युतीची बोलणी अखेर पूर्ण झाली असून याबाबतची आज घोषणा होणार असल्याची माहिती आहे. आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकांसाठी 50-50 टक्क्यांचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे. या पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष अमित शाह येण्याची शक्यता आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. परंतु सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार असल्याचं दिसत आहे. युतीसाठी भाजपने एक पाऊल मागे घेतलं असून पालघरची जागा शिलसेनेला सोडली जाणार आहे. तसेच विधानसभेसाठी शिवसेनेची 50-50 च्या फॉर्म्युलाची मागणीही मान्य झाल्याचा माहिती असुन त्यानुसार शिवसेना-भाजप विधानसभेत प्रत्येकी 144-144 जागांवर लढणार आहेत.त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेवर लक्ष लागलं आहे.
COMMENTS