महायुतीची डोकेदुखी वाढली, एवढ्या जागांवर बसू शकतो फटका?

महायुतीची डोकेदुखी वाढली, एवढ्या जागांवर बसू शकतो फटका?

मुंबई – भाजप-शिवसेना महायुतीला आगामी निवडणूक जास्त जागा मिळू शकतील असा अंदाज सुरुवातीला वर्तवला जात होता. परंतु महायुतीची डोकेदुखी आता वाढत असल्याचं दिसत आहे. कारण या निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षात सुरु असलेल्या बंडखोरीमुळे महायुतीसाठी विधानसभेची वाट बिकट होत असल्याचं दिसत आहे. जवळपास 50 मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप-सेना युतीची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीचं गणित बदलतं की काय? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडाचं अस्त्र उगारलं आहे. अनेक नेत्यांनी आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे. तर काही नेते अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. या बंडखोरीचा फटका महायुतीला बसणार का? हे निवडणुकीनंतरच उघड होणार आहे.

COMMENTS