मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही राज्यात गाजणार असल्याचंं दिसत आहे. अशातच विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभेत भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागा लढणार आहेत तर मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान महायुतीत रामदास आठवले यांचा रिपाइं, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना हे घटकपक्ष आहेत.त्यामुळे कोणत्या घटकपक्षाला किती जागा सोडल्या जाणार याकडे लक्ष लागलं आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते. त्यामध्ये भाजपने 122 आणि शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. परंतु आगामी निवडणुकीत मात्र विधानसभेत भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागा लढणार आहेत तर मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. रविवारी चंद्रकांत पाटील यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
COMMENTS