शिवसेना-भाजपचं अखेर ठरलं, ‘हा’ फॉर्म्युला निश्चित ?

शिवसेना-भाजपचं अखेर ठरलं, ‘हा’ फॉर्म्युला निश्चित ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या दोन्ही पक्षात जागावाटपाची चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 154 ते 159 जागा मिळतील तर दोन्ही पक्ष महायुतीतील मित्रपक्षांना प्रत्येकी 9 जागा सोडतील, असा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला 120 जागा मिळणार असल्याचे दिसत आहेत. या फॉर्म्युल्यावर शिवसेनेनं अजून उत्तर दिलं नसून शिवसेना नेतृत्वाकडून तो मान्य केला जाणार का हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव यांच्या नेतृत्वात भाजपच्या निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे. मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 2 वाजता ही बैठक सुरू होणार असल्याची माहिती आहे. यावेळी निवडणूक निरीक्षकांच्या मतदारसंघ निहाय अहवालावर चर्चा होणार आहे. शिवसेना – भाजप युतीच्या जगावाटप वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याने भाजप लढणार असलेल्या मतदारसंघांचा या अहवालाच्या आधारावर आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडेही लक्ष लागलं आहे.

COMMENTS