मुंबई – शिवसेना – भाजप युतीमधील तिढा कायम असल्याचं दिसत आहे. कारण मंत्री, पदाधिकारी स्तरावर सुरू असलेली शिवसेना – भाजपमधील जागावाटपाची चर्चा आता एकमत होत नसल्याने पुढे सरकली आहे.
जागावटपात अनेक गोष्टींमध्ये एकमत होत नसल्याने आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू झाली आहे.
त्यामुळे जागावाटपाची चर्चा कधी संपणार, युतीला मुहूर्त कधी लागणार हे अद्याप अनिश्चित आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधील चर्चा तरी यशस्वी होणार का हे पाहण गरजेचं आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्येही जागावाटपाची चर्चा सुरु आहे. घटक पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने घटक पक्षांसाठी 38 जागा सोडल्या आहेत परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव घटक पक्षांना मान्य नाही. 55 ते 60 जागांचा प्रस्ताव घेऊन घटक पक्षाचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटणार आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन आघाडीत बिघाडी निर्माण झाली असल्याचं दिसत आहे.
अशातच आता भाजप-शिवसेनेतही जागावाटपावरुन एकमत होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे ही चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता काय तोडगा निघणार हे पाहण गरजेचं आरे.
COMMENTS