मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आहे. 11 पैकी सहा जागांचा प्रश्न नुकताच सुटला आहे. परंतु अद्यापही पाच जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झालेलं नाही. त्यामुळे आता या जागांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर बसून चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या पाच जागांवरुन आता युतीचे घोडे अडले असल्याचं दिसत आहे.
दरम्यान या पाच जागांमध्ये वडाळा (मुंबई), ऐरोली (ठाणे), बेलापूर (ठाणे), उल्हासनगर (ठाणे) औसा (लातूर) या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे या जागांचा तिढा लवकरच सोडवतील असं बोललं जात आहे. तसेच युतीची 29 तारखेपर्यंत कुठलीही अधिकृत घोषणा होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे 29 तारखेनंतर युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS