आगामी विधानसभा निवडणुकीत आणखी एक पक्ष शिवसेना-भाजप युतीत सामील होणार?

आगामी विधानसभा निवडणुकीत आणखी एक पक्ष शिवसेना-भाजप युतीत सामील होणार?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती, काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहूजन आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी या राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. अशातच शिवसेना भाजपमध्ये आमदार बच्चू यांची प्रहार जनशक्ती संघटना युतीत सामील होणार असल्याची माहिती आहे. याबाबत बच्चू कडू यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची भेट घेतली आहे. बच्चू कडू आणि आदित्य ठाकरें यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला ग्रामीण महाराष्ट्रात चांगला जनाधार आहे. याचा फायदा आगामी विधानसभेत शिवसेना-भाजपला होऊ शकतो याचा अंदाज मांडला जात आहे. सध्या विधानसभेत प्रहारचा एक आमदार आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत पाच आमदार निवडून आणण्याचं आमचं लक्ष असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बच्चू कडू हे शिवसेना-भाजपशी युती करणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS