भाजप-शिवसेना स्वबळावर लढणार, भाजपकडून 288 मतदारसंघात चाचपणी?

भाजप-शिवसेना स्वबळावर लढणार, भाजपकडून 288 मतदारसंघात चाचपणी?

मुंबई – लोकसभा निवडणुकीप्रमाणेच शिवसेना-भाजपची युती होणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु आता मात्र भाजप-शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार
असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने 288 विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरु केल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुलाखतींमध्ये शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातही भाजपच्या मुलाखती पार पडत आहेत. त्यामुळे भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरु असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान भाजप-शिवसेनेमधील चर्चेत 50-50 चा फॉर्म्युला रद्दबातल झाल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच दिले होते. युतीच्या जागावाटपावर 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल, असं पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानुसार शिवसेनेसोबतची बोलणी फिस्कटल्यामुळे आता दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

COMMENTS