शिवसेना-भाजपला धक्का, चंद्रकांत खैरे घेणार मोठा निर्णय ?

शिवसेना-भाजपला धक्का, चंद्रकांत खैरे घेणार मोठा निर्णय ?

औरंगाबाद – लोकसभा निवडणुकीसाठी एकत्रित आलेल्या शिवसेना-भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.औरंगाबादमधील या बैठकीला चंद्रकांत खैरे यांच्यासहित सर्व वरिष्ठ पदाधिकारी हजर आहेत. रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये युतीचा प्रचार न करता त्यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी प्रचार केल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. त्यामुळे या बैठकीत चंद्रकांत खैरे मोठा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. दानवे यांनी निवडणुकीत आपल्याला मदत केली नाही असा आरोप त्यांनी केलाय. याची तक्रार भाजपच्या पक्षश्रेष्ठी आणि उद्धव ठाकरेंना करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दानवेंनी युतीचा नाही तर जावई धर्म पाळला, अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत खैरे काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS