दोन सख्खे भाऊ आमनेसामने, ‘या’ मतदारसंघात भाजप – शिवसेनेची मैत्रीपूर्ण लढत !

दोन सख्खे भाऊ आमनेसामने, ‘या’ मतदारसंघात भाजप – शिवसेनेची मैत्रीपूर्ण लढत !

सातारा – विधानसभा निवडणुकीसाठी दोन सख्खे भाऊ आमनेसामने उभे ठाकले आहेत. साताऱ्यातील माण विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेची मैत्रीपूर्ण अनोखी लढत होणार आहे. जयकुमार गोरे यांनी भाजपमधून तर त्यांचे सख्खे भाऊ शेखर गोरे यांनी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे माण मतदारसंघात भाजप- शिवसेनेचा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक उत्कंठा ताणलेला माण-खटाव विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. भाजपकडून माजी आमदार जयकुमार गोरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु युतीची घोषणा होण्यापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या शेखर गोरे यांनाही मातोश्रीवरुन लढण्याची तयारी करण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी तयारीही केली. परंतु युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. तरीही माघार न घेता शेखर गोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता मैत्रिपूर्व लढत होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS