नवी दिल्ली – मोदी सरकारविरोधातला पहिला अविश्वास प्रस्ताव ठराव मोठ्या फरकाने पडला. सरकारच्या बाजून 325 मतं पडली तर विरोधकांच्या बाजूने 126 मतं पडली. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारकडे भक्कम पाठबळ असल्याचं दिसून आलं आहे.अविश्वास प्रस्तावाच्या मतदानाला शिवसेना आणि बीजेडीनं गैरहजेरील लावत तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेची जर हिच भूमिका लोकसभा निवडणुकीतही राहिली तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेना भाजपाला साथ देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु शिवसेनेने ऐनवेळी भाजपाला धक्का देत तटस्थ भूमिका घेतली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सध्या तरी शिवसेनेची एकला चलोची भूमिका आहे. भाजपकडून अनेकवेळा विनवणी करुनही शिवसेना सध्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेची जर हीच भूमिका कायम राहिली तर भाजपची मोठी चिंता वाढणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS