शिवसेना-भाजपमधील वाद विकोपाला, 30 वर्षानंतर असं पहिल्यांदाच होणार!

शिवसेना-भाजपमधील वाद विकोपाला, 30 वर्षानंतर असं पहिल्यांदाच होणार!

नवी दिल्ली – राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापन करण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. या संघर्षात दोन्ही पक्ष विभक्त झाले. त्यानंतर आता हा वाद आणखी विकोपाला गेला असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळातील एकमेव मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला. त्यानंतर आता शिवसेना एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे 30 वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेना एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही.

दरम्यान दिल्लीत सध्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटक पक्षांची बैठक उद्या होणार आहे. परंतु एनडीएच्या बैठकीसाठी भाजपकडून शिवसेनेला आमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेनेकडून कोणताही प्रतिनिधी बैठकीसाठी जाणार नसल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे मोदी सरकारमधील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेनेने एनडीएच्या बैठकीस न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा परिणाम प्रथमच दिल्लीतील संसदीय राजकारणात दिसून येणार आहे.

COMMENTS