पालघर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हासंपर्कप्रमुख अनंत तरे यांना आता रायगड जिल्हयातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग, आणि पेन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगड जिल्हयातील या तालुक्यांचे ते जिल्हासंपर्कप्रमुख म्हणून त्यांची शिवसेनेनं नेमणुक केलीय.
ठाणे शहराचे माजी महापौर संजय मोरे यांच्याकडे रायगड जिल्हयातील कर्जत-खालापूर, पनवेल आणि उरणची तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या तालुक्यांचे ते जिल्हासंपर्कप्रमुख म्हणुन काम पहाणार आहेत.
तसेच पालघर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी विधान परीषद आमदार रवींद्र फाटक यांना देण्यात आलीय. रविंद्र फाटक आता पालघर जिल्हासंपर्कप्रमुख पदी असणार आहेत.
रायगड जिल्ह्याचे विद्यमान जिल्हासंपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांना सिद्धीविनायक मंदीर न्यासाचे अध्यक्ष बनवण्यात आल्यामुळे त्यांच्याकडील रायगड जिल्हासंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी काढण्यात आली आहे. यापुढे आदेश बांदेकर शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणुन राज्यभर दौरे करणार.
COMMENTS