पुणे – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. आयोध्येला जाण्यापूर्वीर त्यांनी शिवाजी महाराजांचे आशिर्वाद घेतले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंचे दैवत आहेत. शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना घेऊन अयोध्येला निघालो, असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शिवनेरीवरील माती एका कलशात भरून अयोध्येतील राम जन्मभूमीतील महंताना देण्यात येणार असून राम मंदिराच्या बांधकामासाठी शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचाही आधार लाभावा अशी यामगची प्रेरणा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांची कुवत काय हे मला ठाऊक आहे. आणखी किती निवडणुकांमध्ये अजून हा मुद्दा घेणार आहात? तेच विचारायला मी अयोध्येत चाललो आहे. मी अयोध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जात असून त्यामुळे मंदिर उभारणीच्या कार्याला वेग मिळणार आहे. ही केवळ शिवनेरीची माती नाही तर तमाम हिंदूंच्या भावना असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तसेच मला ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही, पण मला काही लोकांचं भांडंफोड करायचं आहे. इतकी वर्षे केवळ मंदीर नही बनाएंगेचे आश्वासन आणि घोषणा झाल्या. मला राम जन्मभूमी विषयावर राजकारण करायचं नाही. राम मंदीरासाठी तमाम हिंदुं एकत्र यावेत असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS