अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर उतरले होते.त्यानंतर त्यांनी लक्ष्मण किला या ठिकाणी भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी शिवनेरीवरुन आणलेल्या मातीची अयोध्येत पूजा केली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे, विश्वनाथ महाडेश्वर हेदेखील उपस्थित होते.
दरम्यान रविवारी म्हणजेच उद्या दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे पत्रकारांशी तर एक वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. अयोध्येतील क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज यांना आपले म्हणणे कळावे म्हणून उद्धव ठाकरे हिंदीतून भाषण देणार आहेत.
Humein aaj mandir banne ki tareekh chahiye. Pehle mandir kab banaoge wo batao, baaki baatein to baad me hoti rahengi. Aaj mujhe tareekh chahiye: Shiv Sena Chief Uddhav Thackeray in Ayodhya pic.twitter.com/U68rsl5y4Y
— ANI UP (@ANINewsUP) November 24, 2018
अयोध्येत कोणत्याही परिस्थितीत राम मंदिर झालेच पाहिजे अशी आग्रही भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. एवढेच नाही तर राम मंदिर कधी उभारणार ती तारीख सांगा असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तारीख आज समजलीच पाहिजे. बाकीच्या गोष्टी नंतर होत राहतील असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
COMMENTS