पालघर – पालघरमध्ये राजकीय वातावरण सध्या तापत असल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करण्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे वाटप करताना शिवसैनिकांनी काही लोकांना रंगेहात पकडले असून शिवसैनिकांनी पालघरच्या डहाणू येथील रानशेत भागात पैसे वाटप सुरू असताना, अचानक जाऊन हा डाव उधळला आहे. भाजप पालघर शहराध्यक्षांनी पैसै देऊन, पाठवलं असल्याची माहिती पैसे देणा-या व्यक्तीनं दिली आहे.
दरम्यान या घटनेमुले शिवसेना आणि भाजपमधला वाद विकोपाला जाण्याची शक्यता असून पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून भाजपच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. भाजपकडे एवढा पैसा येतो कुठून, असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान शिवसेनेने केलेले आरोप भाजपने फेटाळले असून हा शिवसेनेचा कट असून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेकडून अशा नाट्यमय घडामोडी घडवल्या जात असल्याचं भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.
COMMENTS