मुंबई – राज्यात महाविकास आघाडीने सरकार स्थापन करुन 14 दिवस झाले आहेत. परंतु अजूनही खातेवाटप करण्यात आले आहे. खातेवाटप न झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारही रखडला आहे. परंतु महाराष्ट्र विकास आघाडीचे खातेवाटप अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे खातेवाटव लवकरच जाहीर केलं जाणार असल्याची माहिती आहे.
कोणत्या पक्षाकडे कोणतं खातं?
शिवसेना
गृह
नगरविकास
परिवहन
उद्योग
सामाजिक न्याय
पर्यावरण
उचच व तंत्रशिक्षण
राष्ट्रवादी
वित्त आणि नियोजन
गृहनिर्माण
कृषी
सार्वजनिक आरोग्य
सहकार
सार्वजनिक बांधकाम
काँग्रेस
महसूल
ऊर्जा
जलसंपदा
आदिवासी विकास
वैदकीय शिक्षण
शालेय शिक्षण
महिला व बालकल्याण
दरम्यान मंत्रिमंडळातील खातेवाटपाबात महाविकासआघाडीच्या नेत्यांची काल बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकासआघाडीकडून खातेवाटपाची यादी लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनाही अजून खातेवाटप झाले नसल्यामुळे हे खातेवाटप कधी होईल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु खातेवाटपाची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती आहे. खातेवाटपच झाले नसल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यताही अद्याप धुसरच आहे. याबाबतही कालच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
COMMENTS