मुंबई – राज्यात लवकरच महाविकासआघाडीचं सरकार ल्थापन होणार असल्याचं दिसत आहे. कारण या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये ही बैठक होत असून या बैठकीनंतर मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, अहमद पटेल आणि बाबा सिद्दीकी तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित आहेत.
दरम्यान मंत्रिपदाचा फॉर्म्युला आणि किमान समान कार्यक्रम, महाविकासआघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार? हे या बैठकीनंतर समोर येणार आहे. तसेच या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. आज सकाळी झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीतही सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी केली. तसेच शरद पवारही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे याबातचीही भूमिका लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
COMMENTS