मुंबई – राज्यात सत्तास्थापन करण्याच्या दृष्टीने मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावार एकमत झाल्याचं सांगितलं आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी मात्र याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला. अजूनही बैठक सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. जेव्हा आम्हाला काही सांगण्यासारखं असेल तेव्हा तीनही पक्ष सांगू. सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान नेहरु सेंटरमधील या बैठकीत काँग्रेसकडून दिल्लीतील नेते मलिक्कार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व मोठे नेते उपस्थित आहेत.शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे सर्व दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे केंद्रातील नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के सी वेणुगोपाल या सर्वांनी पहिल्यांदाच एकत्र बसून चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे.
COMMENTS