महाविकासआघाडीच्या फॉर्म्युल्यात बदल, राष्ट्रवादीला देणार एवढी मंत्रिपदं?

महाविकासआघाडीच्या फॉर्म्युल्यात बदल, राष्ट्रवादीला देणार एवढी मंत्रिपदं?

मुंबई – राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.यामध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर काँग्रेसकडून नितीन देसाई आणि बाळासाहेब थोरात यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. परंतु या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान महाविकासआघाडीच्या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहिती आहे. नव्या बदलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. यापूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपद आणि 15 मंत्रिपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदं देण्यात येणार होती. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसला 16 मंत्रिपदं देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

असा आहे नवा फॉर्म्युला?

शिवसेनेला 15 मंत्रिपदं देण्यात येणार असून यामध्ये मुख्यमंत्रिपद, तसंच 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं वाट्याला येणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 12 कॅबिनेट मंत्रिपदं आणि 4 राज्य मंत्रिपदं मिळणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्रिपदाचाही समावेश असणार आहे तर काँग्रेसला 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदं अशी एकूण 12 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS