शिवसेना नगरसेविकेच्या पतीला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक !

शिवसेना नगरसेविकेच्या पतीला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक !

कल्याण – कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेविकेच्या पतीला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नगरसेविका सारिका जाधव यांचे पती सतीश जाधव यांना खंडणीविरोधी पथकानं ताब्यात घेतलं आहे. २ लाख रुपयांची खंडणी घेताना खंडणीविरोधी पथकाने त्यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान कल्याण प्रभागात मोबाईल टॉवर उभारणाऱ्या जमीन मालकाला ३ लाखांची खंडणी मागितली असल्याचा आरोप सतीश जाधव यांच्यावर करण्यात आला आहे. कल्याण पूर्व येथील साईबाबानगर परिसरात मोबाईल टॉवरचं काम सुरु होतं. याप्रकरणी जाधव यांनी जमीन मालकाला खंडणी मागितली असल्याचा आरोप आहे.सतीश जाधव यांची प्रदीप शर्मा यांच्याकडून चौकशी सुरू असून जमीन मालकाला खडणी मागणं त्यांना चांगलच महागात पडणार असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS