मुंबई – पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल आल्यानंतर आता युतीमधला तणाव टोकाला गेला आहे. शिवसेना राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत मोठा राजकीय निर्णय घेतील अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र सत्तेतून बाहेर पडण्याच्या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी बगल दिली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना वारंवार तुम्ही सरकाारमध्ये आहात का सरकारमधून बाहेर पडणार का ? या प्रश्नावर मात्र त्यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
उद्धव ठाकरे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याच्या प्रश्नाला बगल दिली असली तरी युती यापुढे कायम राहणा असंही सांगितलं नाही. मात्र योग्य वेळी शिवेसना सराकरमधून बाहेर पडेल असे संकेत दिले आहेत. त्यामुळे आज जरी शिवसेनेनं युतीमधून बाहेर पडण्याचे निर्णय घेतला नसला तरी आगामी काळात शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तरी सरकार पडू देणार नाही अशी शक्यता आहे. सरकारमधून शिवसेनेचे मंत्री बाहेर पडतील आणि सरकारला बाहेरुन पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
COMMENTS