गुजरात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं यापूर्वीच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी पक्षानं वचननामा जाहीर केला आहे. या वचननाम्यात अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. तसंच हिंदुत्वाच्या नावावर प्रचारात भर देणार असल्याचंही शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आलंय.
शिवसेनेच्या वचनाम्यामध्ये गुजरातच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन प्रकल्प, शेतमालाला योग्य भाव, सर्वाना वीज जोडणी, तरुणांना रोजगार, जनेतेचे जीवनमान उंचावणाऱ्या विविध योजनांबरोबरच शेतकरी नवतरुण व गोरगरिबांचा सर्वांगिण विकासाच्या योजना पुर्ण करण्याचे वचन दिले आहे. त्याच प्रमाणे नर्मदा योजना पुर्णत्वास नेऊन गुजरातमधील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात मुबलक पाणी देण्याचेही वचनही शिवसेनेने गुजराती मतदार शेतकऱ्यांना दिले आहे.
याबरोबरच व्यसनमुक्ती, महिला सबलीकरण, सुरक्षा, जिवनाश्यक वस्तुचे भाव, जीएसटी दरात कपात, सार्वजनिक शिक्षण, इत्यादी योजनावर या वचननाम्यात भर देण्यात आला आहे. तसेच समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याचे वचन देत गुजरातमधील पाटीदार समाजापुढे मतदानासाठी शिवसेनेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या वचनाम्यात शेतकरी कर्जमाफी, रोजगार, नर्मदा योजना, गोरगरीबांचा विकास, महिला सबलिकरण, या सारख्या प्रमुख विषयांवर जोर देण्यात आला आहे.
गुजरातच्या जनतेसाठी शिवसेना एक सक्षम पर्याय असल्याचे सांगत. शिवेसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी गुजरातचे संपर्क प्रमुख राजुल पटेल, संघटक हेमराज शहा, सेनेचे गुजरात राज्य प्रमुख आणि गोध्राचे माजी आमदार हरेश भट्ट यांच्या उपस्थितीत हा वचननामा जाहीर केला. या वचनामा प्रसिध्द करताना भाजपने गुजरातमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर नेहमीच तडजोड केली असल्याचा आरोप करत गुजरातच्या जनतेमध्ये भाजपाबद्दल तिरस्कार निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे.
COMMENTS