जनाब सेना, कात टाकणाऱ्या शिवसेनेचे मनापासून अभिनंदन – भातखळकर

जनाब सेना, कात टाकणाऱ्या शिवसेनेचे मनापासून अभिनंदन – भातखळकर

मुंबई – मताच्या राजकारणासाठी शिवसेनेने हिंदुत्व आणि भगवा अगोदरच सोडला असून फक्त हिरवा झेंडा घेणे बाकी आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करणे झेपले नाही, उस्मानाबादचे धाराशिव करणे जमले नाही… परंतु ‘हिंदुहृदयसम्राट’चे ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असे नामकरण मात्र यशस्वीपणे केले. कात टाकणाऱ्या शिवसेनेचे मनापासून अभिनंदन. तसेच जनाब सेना असा उल्लेख करीत भाजपचे नेते अतुल भातखळक यांनी हल्ला चढवला.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी करोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी, ‘आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटचीगरज नाही’, असं विधान केलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजना स्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर आता एका कॅलेंडरमुळे पुन्हा एकदा भाजपा नेते शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत.

भाजपाचे नेते अतुल भातखळकर कायमच आपल्या तिखट शब्दांतील माऱ्यासाठी ओळखले जातात. शिवसेनेवर टीका करण्याची संधी ते कधीही सोडत नाहीत. त्यांनी आज एका कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं लिहिलं आहे. कॅलेंडरच्या वरच्या दोन कोपऱ्यांमध्ये शिवसेना आणि युवासेना असंही नमूद करण्यात आलं आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे हे कॅलेंडर मराठी, इंग्रजी याचसोबत उर्दू भाषेतही आहे. कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही.’, असा इशारा दिला. त्यामुळे आता हिंदुत्वावरून शिवसेना-भाजपमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.

COMMENTS