याला काय म्हणायचं ?, बुलेट ट्रेनला सभागृहात शिवसेनेचं समर्थन !

याला काय म्हणायचं ?, बुलेट ट्रेनला सभागृहात शिवसेनेचं समर्थन !

नागपूर – शिवसेनेची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली असून बुलेट ट्रेनच्या पुरवणी मागणीला शिवसेनेनं समर्थन दिलं आहे. यावरुन शिवसेनेची बाहेर एक आणि सभागृहात एक अशी दुटप्पी भूमिका पहायला मिळाली आहे. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध करत भाजपवर चौफेर हल्ले केले होते. परंतु आज धिवेशनाच्य पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेल्या पुरवणी मागणीत बुलेट ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे. याला शिवसेनेनं समर्थन दिलं आहे.

यावर्षीच्या पुरवण्या मागण्या आणि तरतुदी

-यावर्षी 14 हजार कोटींची पुरवण्या मागण्या

– तूर डाळ खरेदीसाठी 1528 कोटींचे कर्ज घेतले होते त्यासाठी प्रमुख तरतुद

– ग्रामीण भागासाठी 1000 कोटी मूलभूत सुविधा तरतुद

– मेट्रो प्रकल्प 850 कोटी तरतूद

-महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना 7

– नागरपालिकांना 546 कोटी तरतूद

– मुंबई अहमदाबाद जलद गती रेल्वे 250 कोटी

– राज्यातील दोन हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले म्हणून 159 कोटींची तरतुद

– केवळ महत्वाचे विषय म्हणून पुरवणी मागण्या

– 2010 मध्ये 7 हजार कोटींची पुरवण्या मागण्या होत्या

दरम्यान राज्य सरकारनं मांलेल्या या पुरवण्या मागण्यावर विरोधकांनी टीका केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील तटकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून आम्ही 1500 कोटी पुरवण्या मागण्या मांडल्या तर आमच्यावर हे तुटून पडत होते. पण हे बजेटच्या 50% पुरवण्या मागण्या मांडत असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. तसेच (हेलिकॉप्टर वर खर्च) उधळपट्टी आहे, कल्याणकारी योजनांच्या निधीत कपात करतात.तसेच शिवसेनेच्या विरोधानंतरही बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकारने आर्थिक तरतुद केली असल्याचंही यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS