सोलापूर – महापालिकेत भाजपला बहूमत असूनही स्थायी समितीचं सभापतीपद शिवसेनेकडे  !

सोलापूर – महापालिकेत भाजपला बहूमत असूनही स्थायी समितीचं सभापतीपद शिवसेनेकडे !

सोलापूर – सोलापूर महापालिकेत भाजपला बहूमत असतानाही शिवसेनेचा नगरसेवकाची स्थायी समितीच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक गणेश वानकर यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर भाजपच्या संजय कोळी यांची सभागृहनेतेपदी नियक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान सभापतीपपदावरुन भाजपमध्ये गोंधळ उडाला असल्याचं पहावयास मिळालं आहे. उमेदवारी अर्जावर अनुमोदक नसल्याने भाजपच्या उमेदवाराला सुमारे तीन तास प्रतीक्षा करावी लागली. काळात शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी मनपा सभागृहनेतेपदी संजय कोळी यांची पक्षाने नियुक्ती केल्याचे घोषित केले. यावेळी निंबर्गी व तिथे उपस्थित महापौर शोभा बनशेट्टी यांनी सत्कार केल्यावर कोळी यांनी पदभारही स्वीकारला.

त्यानंतर सभापतीपदासाठी भाजपच्या अर्जावर अनुमोदकाची सही नसल्यामुळे  हा अर्ज अवैध ठरुन शिवसेनेचे गणेश वानकर यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करत शिवसेनेनं जल्लोष केला. परंतु एकाच दिवशी कोळी व वानकर यांच्या झालेल्या या निवडींबद्दलची मनपाच्या गोटात चर्चा सरु असून एक निवड अधिकृत तर दुसरी अनधिकृत असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS