शिवसेनेच्या वॉट्सअप आणि फेसबूक ग्रूपवर या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काल ‘आंग्रिया’ क्रूझच्या उदघाटन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आलेल्या वागणुकीवर शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. केसरकर यांना मागच्या रांगेत उभं करण्यात आल्याचे छायाचित्रात दिसत आहे. तर भाजपचे आमादार आणि विधानसभेतील प्रतोद राज पुरोहित यांना मात्र मुख्यमंत्रयांच्या शेजारी स्थान होतं.
दरम्यान हा शासकीय कार्यक्रम नव्हता त्यामुळे प्रोटोकॉल नव्हता असं भाजपच्या गोटातून सांगितलं जातंय. मात्र उघडपणे अजून कोणीही काहीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान हीच संधी साधत माजी खासदार निलेश राणे यांनी केसरकर यांची खिल्ली उडवली आहे. यांना कोणीची किंमत देत नाही असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्याची लायकी बघा, कोण ह्यांना खुर्ची सुद्धा देत नाही आणि शिपाई असल्यासारखा माघे उभा आहे. शिवसेना पक्षप्रमुख स्वबळाची वार्ता करता आणि तुमचे मंत्री भांडी घासतायत सरकारमध्ये राहून. pic.twitter.com/Z2X7n1g5ti
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 21, 2018
COMMENTS