मुंबई – खोपोली नगर परिषदेवर आता महिलाराज निर्माण झाले असून खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या विनिता कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदी सुमन अवसरमल या आहेत. तर त्यानंतर आता उपनगराध्यक्षपदी विनिता कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या नगर परिषदेवर आता महिलाराज पहायला मिळणार आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, नगराध्यक्षा सुमन अवसरमल, नगरसेवक मोहन अवसरमल, प्रमिला सुर्वे, अमोल जाधव, विनिता काळे, अर्चना पाटील, माधवी रिठे, सारिका पिंगळे, निकिता पवार, निर्मला शेलार, विभागप्रमुख दिनेश थोरवे उपस्थित होते.
दरम्यान ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांनंतर उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा राजू गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे या पदावर विनिता कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विनिता कांबळे यांचे निवड शहरप्रमुख सुनील पाटील, उपशहरप्रमुख किशोर पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, तालुकाप्रमुख संतोष विचारे यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS